मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडल्यास पालकांवर होणार गुन्हा दाखल

मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडल्यास पालकांवर होणार गुन्हा दाखल

नायलॉनच्या मांज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलांकडे नायलॉनचा मांजा सापडल्यास मुलांच्या पालकांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करणार आहेत. यासंदर्भात नाशिक पोलिसांनी आदेश जारी केला आहे. राज्यात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील सर्रासपणे नायलॉनच्या मांजाचा वापर सुरु आहे.

नायलॉनच्या मांजामुळे अनेकांचा जीव गेला आहे. नायलॉनच्या मांजावर बंदी असताना देखील याचा वापर होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका महिलेचा नायलॉनच्या मांज्यामुळे गळा चिरला गेला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिरावाडीतील रहिवाशी असलेल्या भारती जाधव या दुचाकीवरून हिरावाडीकडे निघाल्या होत्या. यावेळी पतंगाचा मांजा अचानक त्यांच्या मानेला अडकल्याने, तीव्र जखम झाली. घटना घडताच जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, अतिरक्तस्त्राव आणि गळ्याची जखम मोठी असल्यानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना शिक्षा देण्याची मागणी जोर धरु लागली. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी आदेश काढत ज्या मुलांकडे नायलॉनचा मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे.

 

First Published on: January 4, 2021 9:48 AM
Exit mobile version