त्र्यंबक देवस्थान विश्वस्तांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

त्र्यंबक देवस्थान विश्वस्तांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नाशिक : त्र्यंबक देवस्थानचे विश्वस्त भूषण अडसरे यांच्याविरुद्ध सातपूर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार (पोस्को )आणि महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्र्यंबकेश्वर संस्थानाच्या विश्वस्तांवर अशाप्रकारे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून गेला तरी अडसरे विश्वस्त पदावर कायम असल्याने त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२  डिसेंबररोजी रात्री १०.४० च्या सुमारास बेळगाव ढगा परिसरातील हॉटेल डेझर्ट शिप जवळ फिर्यादीचा लहान मुलगा गाडीत बसलेला असताना अडसरे यांनी मुलासमोर अश्लील चाळे करून फिर्यादीच्या कारवर लघुशंका केली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करून गाडी फोडून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादीने सातपूर पोलीस ठाणे गाठून अडसरे यांच्याविरुद्ध तक्रार केली.

पोलिसांनी भादवि कलम ३५४ क ,५०४, ५०६ तसेच बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) अधिनियम २० १२, १२  अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव हे करीत आहेत. त्र्यंबकेश्वर संस्थानच्या विश्वास्तावर अशाप्रकारे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने त्र्यंबक शहरात खळबळ उडाली असून गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटला तरीही अडसरे विश्वस्तपदी कायम असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

तक्रारदार महिला ज्यावेळी पोलीस स्टेशन आली त्यावेळी ती प्रचंड घाबरलेली होती तिने भूषण आडसरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे
– श्याम जाधव, पोलीस उपनिरीक्षक, सातपूर पोलीस स्टेशन

First Published on: February 5, 2023 6:08 PM
Exit mobile version