आनंदवलीच्या गढीत आढळले भुयार

आनंदवलीच्या गढीत आढळले भुयार

नाशिक : आनंदवल्ली येथील पेशवे राघोबादादा व आनंदीबाई यांच्या गढीच्या जागेवर खोदकाम करत असताना भुयार आढळून आले आहे. भुयाराबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, भुयार पाहण्यासाठी मंगळवारी (दि.२३) नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. भुयार आढळून आली ती जागा बांधकाम व्यावसायिकडे असल्याचे नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी सांगितले.

आनंदवल्ली गावात आनंदीबाई यांचे वास्तव्य होते. आनंदीबाई यांची गढी असलेली जागा बांधकाम व्यावसायिकाकडे आहे. याठिकाणी बांधकाम करण्यासाठी खोदकाम करत असताना भुयार आढळून आले. हे भुयार लांबपर्यंत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. भुयार आढळून आलेली जागा खासगी व्यक्तीची असली तरी इतिहासकालीन भुयार असल्याने शासनाने ते जतन करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

First Published on: November 24, 2021 8:35 AM
Exit mobile version