सावधान नशिककर, अलर्ट जारी; अनेक ठिकाणी नागरिक अडकले

सावधान नशिककर, अलर्ट जारी; अनेक ठिकाणी नागरिक अडकले

नाशिक : शहरात गुरूवारी सायंकाळी पावसाने तुफान बॅटींग करत नाशिककरांना अक्षरशः झोडपले. गुरूवारी गणेश देखावे पाहण्यासाठी अखेरच्या दिवशी मोठया संख्येने गणेशभक्तांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता मात्र पावसामुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. शहरात ढगफुटीसदृश्य पावसाने नाशिककरांची अक्षरशः दाणादाण उडवली. या पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर याच पार्श्वभूमीवर नाशिकला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार आजही शहरात पावसाने हजेरी लावण्यात आली असून शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर आज सकाळपासुन शहरात उकाडा जाणवत होता. त्यांनतर सायंकाळच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह पंचवटी, नाशिकरोड, उपनगर, वडाळागाव, इंदिरानगर, द्वारका, जुने नाशिक आदी परिसरात जोरदार सरींचा वर्षाव झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नाशकात पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली.

गणेश मंडळासह भाविकांची धावपळ

एकीकडे शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने अखेरच्या दिवशी देखावे पाहण्यासाठी भाविक उत्सुक होते. मात्र सायंकाळी आलेल्या पावसांनंतर गणेश मंडळासह भाविकांची चांगलीच पळापळ झाली. संध्याकाळी सार्वजनिक मंडळाच्या देखावे खुले करण्याचे काम सुरु होते. मात्र सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यानंतर पुढील एक तास हा पाऊस कोसळत होता. यावेळी तासभर झालेल्या पावसामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यानी देखावे, गणेशमूर्ती, झाकण्यासाठी पान कापडाचा आधार शोधला.

वाहतुक विस्किळीत तर अनेक भागात साचले गुडघाभर पाणी

व्दारका ते जत्रा दरम्यान उडडाणपुलावर गुडघाभर पाणी साचल्याने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच व्दारका ते नाशिकरोड मार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. सातपूर कॉलनी परिसरात पावसाळी गटार योजनेचा भोंगळ कारभार समोर आला. कॉलनी परिसरात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील फुल बाजार परिसरात ड्रेनजचे चेंबरमधून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरात तर गुडघाभर पाणी साचले होते त्यामुळे परिसरातील दुचाकी वाहने पाण्यात गेली.

First Published on: September 8, 2022 8:46 PM
Exit mobile version