हेरगिरी करणार्‍या तरुणाला कोठडी

हेरगिरी करणार्‍या तरुणाला कोठडी

प्रातिनिधिक फोटो

बिहारमधल्या ठिकाणांची होणार तपासणी
भारतीय लष्कराचं प्रमुख प्रशिक्षण केंद्र असलेल्या देवळाली कॅम्प परिसरातल्या प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो पाकिस्तानातील व्हॉट्स अ‍ॅप नंबरवर पाठवणार्‍या संजीव कुमार या तरुणाला पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केलीय. या तरुणाला नाशिकरोड न्यायालयाने काल पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हेरगिरीच्या शक्यतेमुळे गुप्तचर यंत्रणा, लष्करासह पोलीसही सतर्क झाले असून, हेरगिरीचं नाशिक कनेक्शन आणि ठेकेदाराच्या चौकशीसह तरुणाच्या बिहारमधील मूळ ठावठिकाणाचा शोध सुरू आहे. संजीव कुमार हा महिनाभरापासून लष्करी भागात एका ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करत होता.
First Published on: October 5, 2020 4:26 PM
Exit mobile version