नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

नाशकात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

नाशिक : जानेवारी महिना हा कडाक्याच्या थंडीचा असतो. परंतु, वेळोवेळी वातावरणात बदल झाल्याने यंदा कडाक्याच्या थंडीची फारशी अनुभूती आली घेता आली नाही. कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पावसामुळे तापमानात चढउतार होत असल्याने यावर्षी अपेक्षेप्रमाणे थंडीच पडली नाही. पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नाशिकमध्ये आज दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नाशिकमध्ये १ डिसेंबर रोजी दिवसभर व रात्रभर पाऊस झाला. यामुळे गेल्या ५४ वर्षातील विक्रम मोडीत निघाला आहे. यापूर्वी १६ डिसेंबर १९६४ मध्ये सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली होती. १ डिसेंबर २०२१ रोजी ५३.८ मिमी पाऊस झाला.

हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्विट केले आहे की, उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम म्हणून राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 6 ते 9 जानेवारीदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

First Published on: January 8, 2022 8:17 AM
Exit mobile version