हनुमान जयंतीनिमित्त नाशकात वाहतूक मार्गात बदल

हनुमान जयंतीनिमित्त नाशकात वाहतूक मार्गात बदल

हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीनिमित्त नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.२३) दुपारी ३ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत भद्रकाली व पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल राहणार आहे. वझरे मारूती मंदिर (चौक मंडई),दूधबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, रेड क्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड असा मिरवणूक आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

असा आहे पर्यायी मार्ग

First Published on: April 22, 2024 9:12 PM
Exit mobile version