शिवसैनिकांचा मशाली पेटवत जल्लोष

शिवसैनिकांचा मशाली पेटवत जल्लोष

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘मशाल’ हे चिन्ह दिल्यानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जोरदार शक्तीप्रदर्शन करत शिवसैनिकांनी मशाली पेटवल्या. यामुळे शिंदे गटात गेलेल्या मंत्री, खासदार, आमदारांसह अन्य पदाधिकार्‍यांचा निषेध करीत गद्दारांना पाडण्यासाठी मशाली पेटवा असे रणशिंग फुंकण्यात आले.
सामान्य शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारण्याच्यादृष्टीकोनातून शिवसेना कार्यालयाबाहेर रात्री मशाल पेटवून ‘गोंधळ’ विधी करत जल्लोष केला. यावेळी शिंदे गटाच्यानावानेही शिमगा झाला. उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी आमदार योगेश घोलप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कुंपणावरील नेत्यांचे काय होणार?

उद्धव विरूद्द शिंदे गट हा वाद चिघळला असून त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कुंपणावर असलेल्या पदाधिकार्‍यांसमोर भविष्यात काय करायचे हा पेच आहे. या नेत्यांनाही ठोस भुमिका घेता येत नसल्याची कार्यकर्त्यांची खंत आहे.

भाजप व शिंदे गटाने शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिकांच्या नशिबाने मशाल ही निशाणी मिळाली. शिवसेनेने अनेक संकटे पाहिले आणि यापुढेही आमची लढाई सुरुच राहिल. येत्या निवडणुकीत 150 पेक्षा अधिक जास्त जिंकल्याशिवाय राहणार नाही. : बबन घोलप, उपनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 

First Published on: October 12, 2022 2:04 PM
Exit mobile version