.. त्या चार अल्पवयीन मुलींना पुणे पोलीसांनी घेतले ताब्यात

.. त्या चार अल्पवयीन मुलींना पुणे पोलीसांनी घेतले ताब्यात

नाशिकरोडच्या जयभवानीरोड परिसरातील चार अल्पवयीन मुलींचे शुक्रवारी सायंकाळी फर्नांडीसवाडी परीसरातुन अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली होती, शनिवारी सायंकाळी पुणे येथील बंड गार्डन पोलीसांनी रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चार वरुन चारही मुलींना ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी (२३) येथील फर्नांडीस वाडीत राहणा-या इयत्ता आठवीत असणा-या मुलीला तिच्या आईने सायंकाळी सात वाजता जेवन बनवुन ठेव असे सांगुन बाहेर कामासाठी गेल्यानंतर मुलीच्या तिच्या शेजारीच राहणा-या वर्गातील तीन मैत्रिणी बोलवायला आल्या त्यानंतर घर उघडेच ठेऊन बाहेर गेल्या बराच वेळ मुलगी परत न आल्याने शोध घेतला असता मिळुन आली नाही, त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेल्यानंतर तिथे इतर तीनही मुलींचे पालक तक्रार नोंदविण्यासाठी आले होते, यापैकी एक मुलगी तेरा तर एक पंधरा वर्षांची आहे व इतर दोन मुली चौदा वर्षाच्या मुलींना अल्पवयीन मुलींना फूस लाऊन कोणीतरी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सुर्यवंशी यांना मिळालेल्या माहिती प्रमाणे पुणे पोलीसांना माहिती दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता बंडगार्डन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास देशमुख, दामिनी पथकाच्या महिला कर्मचारी यास्मिन खान, सारीका सोनवणे, महेश बेंडुगडे अकबर कुरणे आदींनी येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट नंबर चार येथे या चारही मुली घाबरेलेल्या अवस्थेत मिळुन आल्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात आणुन त्यांची चौकशीकरुन उपनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.जी. जगदाळे, एस.सी. चंद्रमोरे, बबीता म्हसदे, छाया चौधरी यांनी मुलींना ताब्यात घेतले असुन मुलींची चौकशी सुरु आहे.

First Published on: August 24, 2019 8:33 PM
Exit mobile version