वडाळा गावातही करोनाचा शिरकाव; कांदा व्यापारी करोनाबाधित

वडाळा गावातही करोनाचा शिरकाव; कांदा व्यापारी करोनाबाधित

नाशिक जिल्ह्यात कोरोेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अद्यापपर्यंत ८२५ कोरोेनाबाधित झाले असून, मंगळवारी सकाळी आलेल्या १९० अहवालांपैकी २४ जणांचे अहवाल बाधित आले होते. हे सर्व मालेगाव शहरातील रहिवासी आहेत. यानंतर नाशिक शहरातील वडाळा गावात एक ४५ वर्षीय रुग्ण करोनाबाधित आढळून आला आहे. ते रुग्ण कांदा व्यापारी आहेत. ते पिंपळगाव बसवंत येथून कांदा मुंबईत विक्रीला करायचे. आरोग्य विभागाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ८२४ करोनाबाधित रुग्ण असून एकट्या मालेगावात ६४३ रुग्ण आहेत. त्यापैकी ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. 

मालेगावातील २४ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सहा आठ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून मालेगावात दोन अंकी संख्येत नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हता. मात्र, मंगळवारी २४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग हादरुन गेला आहे. तसेच नाशिक महापालिकेच्या पथकाने वडाळा गावातील बाधित आढळलेल्या परिसर सील करण्यास सुरुवात केली असून, नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, सोमवारी नाशिकरोड परिसरातील रेल्वे गार्डला कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर आता वडाळा भागातही शिरकाव झाल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

नाशिक जिल्ह्याची सविस्तर आकडेवारी अशी

मंगळवार, दि.१९ दुपारी १ वाजेपर्यंतचे कोरोना अपडेट असे..

नाशिक जिल्हा एकूण 825

नाशिक शहर एकूण – 48

नाशिक ग्रामीण एकूण – 104 (नाशिक तालुका-9, चांदवड-4, सिन्नर-8, दिंडोरी-9, निफाड-16, नांदगाव-6, येवला-33, कळवण-1, सटाणा-2, मालेगाव ग्रामीण -16

मालेगाव शहर – 643
————————-
एकूण बरे झालेले – 548

एकूण मृत्यू – 42

First Published on: May 19, 2020 12:51 PM
Exit mobile version