नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित पोलिसाचा पहिला बळी

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित पोलिसाचा पहिला बळी

कोरोना व्हायरस

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित पोलिसाचा पहिला बळी
नाशिक : मालेगावासह नाशिक जिल्ह्यात करोनाचे थैमान सुरु असून, शनिवारी (९) नशिक शहरातील आडगावजवळील कोणार्कनगरमधील एका ५१ वर्षीय करोनाबाधित पोलिसाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत नाशिक शहरात दोनजणांचा मृत्यू झाला असून एकट्या मालेगावात १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारी (९) सकाळी प्रशासनास प्रलंबित ५६६ नमुन्यांपैकी २6५ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 215 निगेटिव्ह व 59 पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले. यामध्ये नाशिक शहरात एक मृत करोनाबाधित पोलीस व मालेगावातील 58 रुग्ण करोनाबाधित रुग्णांचे आहेत. मालेगावात 506 रुग्ण करोनाबाधित आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण ६३२ करोनाबाधित असून ४ हजार ५०२ निगेटिव्ह आहेत. ३७८ संशयित रुग्णांचे अद्याप रिपोर्ट प्रलंबित आहेत.

नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मालेगावात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही, मालेगावसह जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावा, मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे. आडगावजवळील कोणार्कनगरमध्ये शुक्रवारी डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असताना शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये कोणार्कनगरमध्ये एक पोलीस करोनाबाधित आढळून आला. रिपोर्ट येऊन अवघे तीन तास झाले असतानाच त्या पोलिसाचा मृत्यू झाला. नाशिक शहरात आत्तापर्यत दोन करोनाचे बळी गेले आहेत. पहिला बळी गर्भवती महिलेचा आहे. तर, दुसरा बळी पोलिसाचा आहे.

आठ दिवसांपासून पोलिसावर सुरु होते उपचार

मालेगावात कर्तव्य बजावत असताना आडगावजवळील कोणार्कनगर येथील ५१ वर्षीय पोलीस कर्मचार्‍यास करोनासदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने त्यांना २ मे रोजी जिल्हा रुग्णालयातील करोना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. ते शुक्रवार (दि.८) पर्यंत उपचारास प्रतिसाद देत होते. शनिवारी (दि.९) पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यांना पुढील उपचारार्थ व्हेंटीलेंटर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. करोनामुळे पोलिसाचा पहिला बळी गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

चांदवडमधील भाजीविक्रेता शेतकर्‍याला करोनाची बाधा

चांदवड तालुक्यातील उसवाड गावातील शेतकर्‍याला करोनाची बाधा झाली आहे. ढोबळी मिरची विक्रीसाठी शेतकरी मनमाड येथे गेलेला आहे. तेथेच करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात शेतकरी आला आहे. करोनाबाधित शेतकर्‍याच्या संपर्कातील नातलग व नातेवाईकांचा आरोग्य विभागाने शोध सुरु केला आहे. सर्वांना क्वारंटाईन केले जात आहे.

नशिक करोना अपडेट

निगेटिव्ह रुग्ण-४५०२
पॉझिटिव्ह रुग्ण-६३२
नशिक-४५ (मृत २)
मालेगाव-506 (मृत १८)
नाशिक ग्रामीण-62
जिल्ह्याबाहेरील-१९

शनिवारी दाखल झालेले संशयित रुग्ण ११३

जिल्हा रुग्णालय -०२
नाशिक महापालिका रुग्णालय-०२
मालेगाव महापालिका रुग्णालय-४०
नाशिक ग्रामीण-६७
गृह विलगीकरण-०२

First Published on: May 9, 2020 7:15 PM
Exit mobile version