नाशिकमध्ये कामाच्या ठिकाणीही मिळणार आता लस

नाशिकमध्ये कामाच्या ठिकाणीही मिळणार आता लस

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार संघटीत क्षेत्रांसाठी ज्यामध्ये शासकीय व खाजगी कार्यालय, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आदी अंतर्गत येणार्‍या ४५ वर्षावरील कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अर्थात ऑफिसमध्ये आता लसीकरण करून मिळणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा व महापालिका प्रशासनाच्या वतीने नियोजन केले जात असल्याची माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली
यासाठी जिल्हा टास्क फोर्सने नियोजन करून ज्या शासकीय किंवा खाजगी आस्थापना इच्छूक आहेत त्यांच्याशी समन्वय साधावयाचा आहे. या आस्थापनेवरील वरिष्ठ अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून निर्देशित होतील व त्यांनी या लसीकरण मोहिमेसाठी जवळील कोवीड लसीकरण केंद्राशी समन्वय ठेवायचा आहे.

कार्यालया जवळील लसीकरण केंद्राची जबाबदारी

सद्यस्थितीतील कोवीड लसीकरण केंद्रावर पडणारा ताण तसेच होणारी गर्दी याला काही प्रमाणात आळा बसेल. लसीकरणामध्ये काहीशी सुसुत्रता येण्यास मदत होईल. संबंधित आस्थापनांनी कर्मचारी वर्गाचे लसीकरण करून घ्यावे.

– डॉ.बापूसाहेब नागरगोजे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका 

First Published on: April 16, 2021 7:49 PM
Exit mobile version