वर्दीच उतरवतो; लॉकडाऊनमध्ये पोलिसांशी वाद घालणार्‍यास न्यायालयीन कोठडी

वर्दीच उतरवतो; लॉकडाऊनमध्ये पोलिसांशी वाद घालणार्‍यास न्यायालयीन कोठडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये कारचालकाने पोलिसांशी वाद घालत शिवीगीळ केली. माझे कोणीही काहीही करु शकत नाही, तुझी वर्दीच उतरवतो, असे म्हणत कारचालकाने अश्लील भाषेत बोलणे केले. ही घटना शनिवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजता भारत मेडीकलसमोर, पवननगर, सिडको येथे घडली. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप दिलीप गोरे (२८, नेमणूक पोलीस आयुक्तालय) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन निंबा गोसावी (३४, रा.तीर्थरुप बंगला, कालिका पार्क, उंटवाडी) यास अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करु नये, यासाठी चौकाचौकात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातून कर्तव्य बजावण्यासाठी संदीप गोरे यांची अंबड पोलीस ठाणेहद्दीत नेमणूक करण्यात आली आहे. पवननगर येथील भाजी मार्केटबाहेर कार पार्किग करण्यावरुन चेतन गोसावी याने पोलिसांशी वाद घातला. पोलीस शिपाई संदीप गोरे यांच्याशी त्याने बाचाबाची केली. पोलीस कर्तव्य बजावत असतानाही त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक व संदीप गोरे यांच्या नावाने एकेरी भाषेत उल्लेख केला. तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत त्याने अश्लील भाषेत बोलणे केले. माझे कोणीही काहीही करु शकत नाही, तुझी वर्दीच उतरवतो, असे म्हणत त्याने गोरे यांना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे करत आहेत.

किरकोळ कारणातून दोघांना मारहाण

घराच्या गच्चीवरील प्लायबुड पाणी का मारले, याचा जाब विचारल्याने एकाने दोनजणांना मारहाण केल्याची घटना गंगावाडी, रविवारपेठ येथे घडली. याप्रकरणी किशोर रघुनाथ जाचक यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दिगंबर ऊर्फ भैय्या संजय चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घराच्या गच्चीतील प्लायवुडवर पाणी का टाकले, असे अश्विनी सतीश चव्हाण यांनी दिंगबर चव्हाण यांना विचारले. राग अनावर झाल्याने त्याने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी त्यांचे भाऊ मध्यस्थी झाले असता त्यांनाही दिंगबर चव्हाण याने मारहाण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र पवार करत आहेत.

झोपेत युवतीचा मृत्यू

घरात झोपलेल्या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना लक्ष्मी टाऊनशीप, सातपूर येथे घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुरेखा संदीप वैराळ (२४,लक्ष्मी टाऊनशीप, सातपूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुरेखा वैराळ यांना सहा महिन्यांपुर्वी अर्धांगवायुचा झटका आला होता. शनिवारी (दि.४) सकाळी ११.३० वाजेदरम्यान त्या घरात झोपेल्या होत्या. त्यांची काहीएक हालचाल न झाल्याने कुटुंबियांनी उपचार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद करत आहेत.

First Published on: April 5, 2020 2:55 PM
Exit mobile version