खासगी हॉस्पिटलची कोविड सेवा सुरूच राहणार

खासगी हॉस्पिटलची कोविड सेवा सुरूच राहणार

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे सांगत कोविड सेवा बंद करण्याचा निर्णय हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने मंगळवारी उशीरा घेतला होता. मात्र, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर असोसिएशनने दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, खासगी हॉस्पिटल्सने अशा अनिश्चिततेच्या काळात परस्पर सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला होता.

समस्या सुटतील, आधी चर्चा करा : आयुक्त जाधव

डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या बैठकीत आयुक्त जाधव म्हणाले की, प्रत्येक समस्येवर तोडगा निघू शकतो. मात्र, त्यासाठी चर्चा अपेक्षित असते. कोविड सेवा बंद करण्याचा निर्णय परस्पर घेणे योग्य नाही, असेही आयुक्तांनी सांगितले. कोरोना काळात अखंड सेवा देताना डॉक्टरांचे मनःस्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला होता, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. मात्र, आयुक्तांनी असा निर्णय घेऊ नका, अशी सूचना केली.

First Published on: June 2, 2021 4:30 PM
Exit mobile version