पोलीस आयुक्तांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

पोलीस आयुक्तांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात आदिवासी बांधवांचा डोंगर्‍या देव उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाचा हा उत्सव वेगळा ठरला तो नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या विशेष उपस्थितीमुळे.

आमदार नितीन पवार आणि पाण्डेय यांच्या सहभागामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला होता. पोलीस आयुक्तांनी पारंपरिक पेहरावात सहभागी होत आदिवासी बांधवांसोबत तारपा नृत्यावर ठेकाही धरला. काठरे दिगर गावात अत्यंत जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला.

First Published on: December 15, 2021 7:37 PM
Exit mobile version