ब्राह्मणगावात सिलेंडरचा स्फोट; दोन घरे जळून खाक

ब्राह्मणगावात सिलेंडरचा स्फोट; दोन घरे जळून खाक

ब्राह्मणगाव  ( ता.बागलाण) येथील हिरावाडी शिवारातील आदिवासी वस्तीतील दोन घरे सिलिंडरच्या स्फोटामुळे जळून खाक झाली. आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोघं कुटुंबांना संसार उपयोगी नवीन वस्तू, भांडे, किराणा, नवीन चादर सर्व घेऊन देत त्यांना धीर दिला.

एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे बाजूच्या घरांनी पेट घेतला. दोन कुटुंबांचे संसार पूर्णपणे जळून खाक झाली झूराबाई नागु पवार यांचे बोकड व बकऱ्या विक्रीचे सुमारे दीड लाख रुपये, धान्य व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले. श्रावण धोंडू कुवर यांच्या घरात स्वयंपाक चालू असताना अचानकपणे स्फोट झाला. काही कळण्याच्या आत सर्व अस्ताव्यस्त झालेले पाहून घबराट निर्माण झाली. यादरम्यान बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोघं कुटुंबांना संसार उपयोगी नवीन वस्तू, भांडे, किराणा, नवीन चादर सर्व घेऊन देत त्यांना धीर दिला. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड सामाजिक कार्यकर्ते श्याम बगडाने पंचायत समिती सदस्य अतुल आहिरें. विनोद अाहिरे. किरण अहिरे, मुन्ना भामरे, ग्रामसेवक निंबा सोनवणे व तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

First Published on: April 29, 2020 11:17 PM
Exit mobile version