शिवाजी चुंभळे यांना जिल्हा उपनिबंधकांची नोटीस

शिवाजी चुंभळे यांना जिल्हा उपनिबंधकांची नोटीस

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे हे लाच प्रकरणी झालेली अटक 48 तासांपेक्षा अधिक कालावधींची झालेली असल्याने, त्यांचे सभापती का काढून घेण्यात येऊन नये, अशी नोटिस जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने चुंभळे यांना बजावली आहे. समितीच्या कार्यालयाला सोमवारी(दि.26) सकाळी दहा वाजता प्राप्त झाली होती. चुंभळे यांना समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे.

बाजार समितीच सभापतीपद लोकसेवक या वर्गात येत असल्याने कोणत्याही लोकसेवकाला 48 तासांपेक्षा अधिक काळ अटक झालेली असल्यास त्याने स्वतःहून पदाचा राजीनामा देणे, अपेक्षित असते. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन कायदा 1963 च्या कलम 45 (1)च्या अन्वये बाजार समिती सभापती पदावरून निलंबित का करण्यात येऊ नये,अशी नोटस बजावली होती. लाचलुचपत विभागाने सहकार विभागाला कारवाई संबंधी कळविल्यानंतर जिल्हा उपनिंबधकांनी बाजार समितीच्या सभापतींचे पद रद्द करण्याची चाचपणी करताना कायदेशीर बाबींचा अभ्यास केलेला होता. दरम्यानच्या काळात चुंभळे यांना लाच प्रकरणी न्यायालयीन कोठडी झाली होती. त्यानंतर जामीनही मंजूर झाला होता. तर विदेशी मद्य बाळगल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागानेही चुंभळे यांची चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले होते.

ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर सध्या चुंभळे यांना सोमवारी आणि मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागात हजेरी लावावी लागते, तर बुधवारी आणि गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजेरी लावावी लागते. तसेच इतर दिवशी बोलवणे होईल तेव्हाही त्यांना दोन्ही विभागात हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे बाजार समितीत त्यांचे पद रद्द होण्याची चर्चा सुरू झालेली होती. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी नाशिक बाजार समितीला सभापती शिवाजी चुंबळे यांचे सभापती पद रद्द का करण्यात येऊ नये ही नोटीस पाठविलेली होती. ती सोमवारी समितीच्या कार्यालयाला मिळालेली होती. नोटीसीत आठ दिवसात उत्तर देण्याची कालमर्यादा घालून दिलेली होती.

First Published on: August 26, 2019 8:50 PM
Exit mobile version