किडण्या खराब झालेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू

किडण्या खराब झालेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

पत्नीला पोटगी दिली नाही म्हणून मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गोरख रामदास काकडे (३५, रा.जांभे, ता. चाळीसगाव) या कैद्याचा दोन्ही किडन्या खराब दोन्ही किडण्या खराब झाल्याने उपचारादरम्यान संदर्भ सेवा रुग्णालयात मृत्यू झाला. ह्या कैद्याची तीन दिवसांपूर्वीच मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. कैद्याच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

सदर कैदी हा खासगी वाहनावर वाहनचालक म्हणून काम करत होता. काही वर्षांपूर्वी पत्नी दीपालीसमवेत कौटुंबिक वाद झाल्याने मालेगाव न्यायालयाने दीपालीला ऑक्टोबर 2016 पासून प्रतिमहिना तीन हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश गोरखला दिले होते. मात्र, किडण्या खराब झाल्याने उपचारासाठी पैसे खर्च होत असल्याने पत्नीला पोटगी देणे शक्य होत नव्हते. पत्नीने या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने ११ महिन्याची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे ३ दिवसापूर्वीच त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात झाली होती.

पोलीस आयुक्तांना निवेदन

गोरखच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी शनिवारी (३१) पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना निवेदन दिले आहे. गोरखला गंभीर आजार असल्याची माहीती असतानाही कारागृहात रवानगी करणार्‍या व त्याच्या मृत्यूस कारणीभुत असलेल्या पत्नी दिपाली, मालेगाव येथील न्यायाधीश कोर्ट नंबर तीन व मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

First Published on: August 31, 2019 8:46 PM
Exit mobile version