पंचवटीतील गांधी तलावात बुडून परप्रांतियाचा मृत्यू

पंचवटीतील गांधी तलावात बुडून परप्रांतियाचा मृत्यू

गोदाघाटावरील गांधी तलावात बुडून परप्रांतीय युवकाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार रविवारी (दि.१६) उघडकीस आला.
रामकुंड परिसरात काही पर्यटकांना गांधी तलावात लगन वासुदेव मांझी (२६, हल्ली रा. पंचवटी, मूळ रा.बिहार) पाण्यावर तरंगत असल्याचा दिसला.

स्थानिक नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. लगन शनिवारी (दि.१५) सायंकाळी ७.३० वाजता कामानिमित्त बाहेर जाऊन येतो, असे कुटुंबियांना सांगून गेला तो परत आलाच नाही. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार एच. आय. शेख तपास करत आहेत.

First Published on: June 17, 2019 9:38 PM
Exit mobile version