आमदार गावित घेतील तो निर्णय मान्य

आमदार गावित घेतील तो निर्णय मान्य

इगतपुरी तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. आमदार निर्मला गावित शिवसेना प्रवेशाबाबत रविवारी (दि.१८) दुपारी त्यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांची विशेष बैठक झाली. बैठकीत मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार गावित घेतील त्या निर्णयास एकमुखाने पाठिंबा देत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी प्रमुख पदाधिकारी व समर्थकानी मनोगत व्यक्त केले.

गेल्या दहा वर्षांत सुरुवातीच्या पाच वर्षांत आमदार गावित यांनी सत्ता पक्षातील शासनाच्या कार्यकालात अनेक योजना, विविध प्रकल्प आणि विकासाच्या योजना मार्गी लावत कामे केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्या तुलनेत अनुशेष भरून काढता आलेला नाही. म्हणून रखडलेले विविध प्रकल्प आणि विकासाच्या योजना मार्गी लावण्यासाठी आमदार गावित या जो निर्णय घेतील ते तोरण बांधून त्यांच्या पाठीशी ठाम राहाण्याचा निर्णय आज शेकडो समर्थकांनी घेतला आहे. त्यामुळे गावित यांचा शिवसेनेत जाण्याचा मार्ग कार्यकर्त्यांनी मोकळा करून दिल्याचे स्पष्ठ झाले आहे.

यावेळी बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, इगतपुरी उपनगराध्यक्ष नईम खान, जनार्दन माळी, गोरख बोडके, महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेस सचिव भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष कचरू डुकरे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धोंगडे, माजी सभापती कचरू शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

First Published on: August 18, 2019 7:26 PM
Exit mobile version