प्रेमसंबंधास नकार; अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी

प्रेमसंबंधास नकार; अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी

प्रेमसंबंध ठेवण्यास महिलेने नकार दिल्याने तरुणाने अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिल्याची घटना देवळाली कँम्प येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेने देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय नगर, देवळाली कँम्प येथील संशयित बळवंत नारायण ससाणे (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयिताने एकतर्फी प्रेमातून १५ ऑगस्ट २०२१ पासून पीडित महिलेचा पाठलाग केला. संशयिताने महिलेला कॉल, मेसेजव्दारे प्रेमसंबंध ठेव, अशी मागणी केली. त्यास महिलेने नकार दिला. राग अनावर झाल्याने संशयिताने महिलेला शिवीगाळ करुन अंगावर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एम. पानसरे करत आहेत.

First Published on: December 26, 2021 4:36 PM
Exit mobile version