देवळा : सिलिंडर स्फोटात रोकड, दागिन्यांसह संसार खाक

देवळा : सिलिंडर स्फोटात रोकड, दागिन्यांसह संसार खाक

देवळा । तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि.८) सकाळी ७ वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही या घटनेत १५ ते १६ लाखांचे नुकसान झाले.

आगीत सर्व शासकीय कागदपत्रांसह कपाटात ठेवलेली २ लाख १५ हजार रुपयांची रोकड. सुमारे ३ लाख रुपयांचे सहा तोळे सोने. घरात ठेवलेले लग्न मंडपाचे साहित्य, घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सर्व सामान जळून खाक झाले. या घटनेत सुमारे १५ ते १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती मिळताच सरपंच पौर्णिमा सावंत, पोलीस पाटील प्रल्हाद केदारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महसूल विभागाला पंचनामा करण्यासाठी विनंती केली. त्यानुसार तलाठी आणि ग्रामसेवक यांनी भाऊराव सुखदेव सावंत, लालजी सावंत, कृष्णाजी सावंत, संजय पानसरे, देवाजी सावंत आदींनी पंचासमक्ष घटनेचा पंचनामा केला. आग विझविणयासाठी असंख्य तरूणांनी प्रयत्नांची शिकस्त करत आग आटोक्यात आणली. परंतु, तोपर्यंत सुमारे १५ ते १६ लाख रुपये किंमतीचे विविध प्रकारचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते. दुष्काळी परिस्थितीत एवढे मोठे नुकसान झाल्याने या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासत होती. तरीही असंख्य तरूण व ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली.

First Published on: April 8, 2024 11:15 PM
Exit mobile version