नवसंशोधन : उपकरण शोधणार खराब कांदा

नवसंशोधन : उपकरण शोधणार खराब कांदा

चुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे साधरण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. चाळीत कांदा सडण्यास सुरुवात झाल्याचे लक्षात आल्यास उरलेला कांदा वाचवता येतो. यातून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळता येते. या दृष्टीने नाशिक येथील वैज्ञानिक प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी विशिष्ट सेन्सरचा उपयोग करत उपरकण बनवले. अमोनिया, आर्द्रता आणि गॅसवरून सडलेला कांदा या उपकरणातून शोधून काढला जाणार आहे.

या उपकरणाचा डेमो नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना लासलगावी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नाफेडच्या वतीने हे उपकरण प्रमोट करण्याचे आश्वासन नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिले. कांदा चाळीत हे उपकरण ठेवून कांद्याच्या आर्द्रतावरून चाळीत कुठल्या भागात कांदा सडला आहे, हे उपरकण सेन्सरद्वारे दर्शवतो. यामुळे खराब होणारा कांदा तात्काळ लक्षात येऊन तो चाळीतून बाहेर काढून बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचवता येणार आहे.

कांदा बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ-उतार हे पाहून या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला. यांचा अभ्यास करताना असे लक्षात आलं, शंभर किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ३०-४० टक्के कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय गरजेचे आहेत. याचाच विचार करून उपकरण निर्मिती केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

First Published on: July 16, 2021 9:00 AM
Exit mobile version