ओबीसी आरक्षणासाठी दिंडोरीत रस्ता रोको

ओबीसी आरक्षणासाठी दिंडोरीत रस्ता रोको

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला नुकतीच स्थगिती दिलेली आहे. केंद्र शासणाने ओबीसींचा इम्परीकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्याने हे घडले आहे. हा ओबीसी समाजावर झालेला अन्याय आहे तरी केंद्र शासनाने त्वरित ओबीसींची जनगणना करून हा डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करावा व ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करावा, यासाठी दिंडोरीत समता परिषद व ओबीसी कार्यकर्त्यांनी बस स्टॅन्डसमोर रास्ता रोको करून घोषणाबाजी केली.

छगन भुजबळ, समीर भुजबळ, दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. रस्त्याच्या दोन्ही बाजूने रांगाच रांगा लागल्या होत्या. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपनिरीक्षक कल्पेश चव्हाण यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेतले. आरक्षण मान्य न झाल्यास अन्यथा छगन भुजबळ. समीर भुजबळ, दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी भास्कर भगरे, शंकराराव काठे, डॉ. योगेश गोसावी, सचिन देशमुख, श्यामराव हिरे, गणेश तिडके, जगदीश सोनवणे, दुर्गेश चित्तोडे, अनिल गोवर्धने, बाकेराव मौले, हर्षल काठे, राजाभाऊ गोसावी, दत्ताभाऊ ढाकणे, तौसिफ मणियार, निलेश गटकळ, संदीप गोतरणे, बबनराव जाधव, बापू तासकर, रघुनाथ गायकवाड, छबू मटाले, सोनु काठे, युवराज कोरडे, विकी पगारे, रवी देशमुख, गोविंद ढाकणे, संतोष नवले, मंजुर शेख, शांताराम पगार आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.

First Published on: June 23, 2021 4:35 PM
Exit mobile version