डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यूप्रकरण : सात दिवसांत समिती देणार अहवाल

डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यूप्रकरण : सात दिवसांत समिती देणार अहवाल

डॉ. स्वप्नील शिंदे मृत्यूप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशास अधीन राहून आरोग्य विज्ञान विद्यापीठाने समिती गठीत केली आहे. या समितीमार्फत आता चौकशी केली जाणार आहे.या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश विद्यापीठामार्फत देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी डॉ. शिंदेप्रकरण १५ दिवसांत निकाली काढू असे सांगत आडगाव पोलिसांना लवकरात लवकर तपास करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, अद्यापपावेतो व्हिसेरा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही.

आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये स्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतिशास्त्र अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षांत शिकणार्‍या डॉ. स्वप्नील शिंदे (वय २६) याचा मृत्यू कशामुळे हे अद्याप स्पष्ट आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तींचे जबाब घेत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबकडे व्हिसेरा पाठवण्यात आला आहे. त्या अहवालातूनच स्वप्नील शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला आहे, हे समजणार आहे. त्यामुळे पोलीस व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहेत. तसेच, समितीच्या अहवालानंतरच विद्यापीठामार्फत पुढील कारवाई केली जाणार आहे. कॉलेज प्रशासनाकडून याप्रकरणी स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.

First Published on: August 19, 2021 8:11 PM
Exit mobile version