वाढत्या विरोधामुळे भुजबळ वेटींगवर

वाढत्या विरोधामुळे भुजबळ वेटींगवर

स्थानिक शिवसैनिकांच्या टोकाच्या विरोधामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार छगन भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार नसल्याचे शिष्टमंडळाने स्पष्ट केले आहे. स्थानिक नेत्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शनिवारी (दि.24) ‘मातोश्री’वर भेट घेवून भुजबळांना विरोध केला.

शिवसेना प्रमुखांना अटक करणार्‍यांना पक्षात प्रवेश दिला तर, शिवसैनिकांंमध्ये चुकिचा संदेश जाईल. तसेच उत्तर महाराष्ट्रात शिवसेना सपुष्टात येण्यास कारणीभूत ठरेल, असा विश्वास त्यांनी ठाकरे यांच्या समोर व्यक्त केला. तथापि, भुजबळांचे वारंवार निरोप येत आहेत. पण त्यांना पक्षात घेण्याबाबत आपण कोणताही विचार अद्याप केलेला नाही. त्यामुळे नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपले काम सुरुच ठेवा, असा मौलिक सल्ला उध्दव ठाकरे यांनी नाशिकच्या शिष्टमंडळास दिला. दरम्यान, ज्यावेळी मुंबईत सचिन अहिर शिवसेनेत गेले त्यावेळीही भुजबळांच्या नावाची चर्चा झाली होती. म्हणूनच मुंबईत त्यांच्या प्रवेशाला विरोध करणारे पोस्टर्स झळकले होते. त्याच मजकुराचे, तसेच पोस्टर्स नाशकात लागले व नंतर लगेचच काढलेही गेले.‘साहेबांना, म्हणजे शिवसेनाप्रमुखांना दिलेला त्रास महाराष्ट्र विसरू शकत नाही’, असा मजकूर त्या पोस्टर्सवर लिहून हा विरोध नोंदविला गेला होता.

प्रवेशाच्या केवळ अफवा

भुजबळ यांना पक्षात घेण्याच्या कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. प्रवेशाच्या केवळ अफवा पसरत असून त्याकडे लक्ष देवू नका! असे आश्वासन पक्षप्रमुखांनी दिले आहे. – बबनराव घोलप, माजी मंत्री (शिवसेना)

First Published on: August 25, 2019 8:48 PM
Exit mobile version