शिक्षण अधिकार्‍यांची रणजित डिसलेंना धमकी

शिक्षण अधिकार्‍यांची रणजित डिसलेंना धमकी

नाशिक : ज्ञानेश्वर क्षीरसागर ‘आमचं ऐकलं नाही तर तुमचा वारे गुरुजी करू’ अशी धमकी आंतरराष्ट्रीय ग्लोबल पुरस्कारविजेते रणजित डिसले यांना चक्क शिक्षण अधिकार्‍यांनी दिल्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून काम कसे करायचे, अशी व्यथा रणजित डिसले यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.
वाबळेवाडी या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वारे यांना शिक्षण व्यवस्थेने अडथळ्यांची व्यवस्था निर्माण करत पद्धतशीर अडकवले.

संशोधन रजा मंजुरीवरून शिक्षण विभागाने अडवणुकीचे धोरण केल्याने रणजित डिसलेही चर्चेत आले आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत अध्यापन करतात. शिक्षण क्षेत्रात अध्यापनात सुलभता, नाविन्यता, गुणवत्ता विकासासाठी डिसले यांनी क्युआर कोड विकसित केला. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन त्यांना ग्लोबल टिचर हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

अमेरिका सरकारने त्यांना प्रतिष्ठित स्कॉलरशिप दिली. परदेशात शैक्षणिक संशोधनसाठी अमेरिका सरकारकडून फुलब्राइट स्कॉलरशिपसाठी त्यांची निवड झाली. पीस इन एज्युकेशन या विषयात ते संशोधन करतील. मात्र, यासाठी शासन परवानगी आवश्यक असून शिक्षण विभाग मात्र परवानगी देत नसल्याचे दिसते. याउलट धमकावल्याची खंत त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.

First Published on: January 23, 2022 8:45 AM
Exit mobile version