अठरा महिने उलटून गेल्यानंतर ही पाच एकर ऊस शेतात…शेतकरी आर्थिक अडचणीत

अठरा महिने उलटून गेल्यानंतर ही पाच एकर ऊस शेतात…शेतकरी आर्थिक अडचणीत

लासलगाव : राज्यातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय साखर कारखाने बंद होऊ देणार नसल्याची घोषणा राज्य शासनाकडून केल्या गेली मात्र या घोषणेला साखर कारखान्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे समोर आले निफाड तालुक्यातील तारुखेडले येथील अर्धांग वायूच्या आजाराने त्रस्त असलेले ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब रामप्रसाद आंधळे यांचा अठरा महिने उलटून गेल्यानंतर ही पाच एकर ऊस शेतात पडून असल्याने आर्थिक संकटात सापडले आहे

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील तारूखेडले या गावातील ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब आंधळे यांची साडेबारा एकर शेती असून त्यांना अर्धांग वायूचा आजार झाल्याने शेतीकडे आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी एमबीए तून शिक्षण घेऊन मुंबई येथे नोकरी करणारा त्यांचा लहान मुलगा सुजित आंधळेने नोकरी सोडून देत गावी तारुखेडले येथे आला पाच एकर शेतात चुलते रघुनाथ आंधळे यांच्या मदतीने पारंपारिक शेती असलेल्या उसाची लागवड केली होती भाऊसाहेब आंधळे हे गेल्या वीस ते बावीस वर्षांपासून नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखान्याला ऊस देत असून चालू वर्षी कारखान्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कोणत्या प्रकारचे ऊस तोडणीसाठी कामगार अजून पर्यंत पाठवले नसून 18 महिन्यांचा ऊस झाला आहे तर चुलते रघुनाथ आंधळे यांनी रानवड साखर कारखान्याकडे ऊस तोडणी साठी नोंद केली होती मात्र त्या कारखान्याकडून नाही कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यातच आता पाउस उंबरठ्यावर उभा आहे.

मग आता या उसाचे करायचे काय असा मोठा प्रश्न या शेतकर्यांपुढे उभा राहिला आहे यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने उस लागवडी करता घेतलेले कर्ज, घरात वडील भाऊसाहेब आंधळे ही अर्धांगवायूच्या त्रासाने पासून ग्रस्त असून त्यांचा औषधोपचारांचा खर्च, कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा मोठा प्रश्न या तरुण सुजित आंधळे या शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे एक तर ऊस घेऊन जा नाहीतर आमच्या समोर आत्मदहना शिवाय पर्याय नसल्याचे सांगत आहे. अशाच प्रकारे निफाड तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची देखील ऊस तोडणीला आलेले असून ऊस घ्यायला कारखाने तयार नसल्याने त्यांच्या पुढे देखील असाच मोठा प्रश्न निर्माण झाला.

First Published on: June 10, 2022 6:32 PM
Exit mobile version