इंजिनिअर, एमबीए धारकांनी केले वॉर्डबॉय पदासाठी अर्ज

इंजिनिअर, एमबीए धारकांनी केले वॉर्डबॉय पदासाठी अर्ज

प्रातिनिधिक फोटो

कंत्राटी पध्दतीने भरती केल्या जाणारया महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील रिक्त पदांसाठी अर्ज घेण्यासाठी आज महापालीकेच्या वैद्यकिय विभागात उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने मनपा मुख्यालय गजबजून गेले होते. १३६ पदांसाठी राबविण्यात येत असलेल्या या भरती प्रक्रियेत वॉर्डबॉय पदासाठी अक्षरशः पदवीधर, इंजिनिअर, एमबीए, इंजिनिअर धारकांनीही अर्ज घेण्यासाठी हजेरी लावल्याने बेरोजगारीचे भयानक वास्तव यातून समोर आले.

देशात आर्थिक मंदीची लाट आहे. मोठ मोठया कार्पोरेट कंपन्यांना याची झळ बसत असून अनेक कंपन्यांनी सक्तीची सुटीही जाहीर केली आहे तर काही कंपन्यांली ले ऑफ देणे सुरू केले आहे. इतकेच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण योगदान देणारया कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्विकारल्याने या मंदीची झळ सर्वच क्षेत्राला बसत आहे यातून बरोजगारीचे मोठे संकट उभे राहीले आहे म्हणूनच शासनाच्या भरती प्रक्रियेत एका जागेसाठी शेकडोने अर्ज दाखल होत असल्याचे चित्र दिसून येते. याची प्रचिती नाशिकमध्येही येत आहे. नाशिक महापालिका रूग्णालयातील स्टाफ नर्स, मिश्रक, वॉर्डबॉय, आया, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गातील १३६ पदांसाठी सहा महिन्यांकरिता भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महापालिकेच्या आरोग्यसेवेवरच वाढता ताण आणि मनुष्यबळाची कमतरता विचारात घेता शासनाच्या परवानगीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याकरीता मनपाच्या वैद्यकिय विभागात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अर्ज घेण्यासाठी महापालिका मुख्यालय उमेदवारांच्या गर्दीने गजबजून गेले होते. विशेष म्हणजे या पदांसाठी उच्चशिक्षित तरूणांचीही मोठी गर्दी दिसून आली. वॉर्ड बॉय पदासाठी तर अगदी उच्च शिक्षित उमेदवारांनी अर्ज घेण्यासाठी लावलेली उपस्थितीत बरोजगारीचे संकट किती गंभीर आहे याची प्रचिती देणारी ठरली.

३१ ऑगस्टपर्यंत मुदत

महापालिकेने या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांकडून २९ ऑगस्टपर्यंत अर्ज मागवले होते. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील तिसर्‍या मजल्यावरील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत अर्ज सादर करण्याचीही मुदत देण्यात आली आहे. मात्र यासाठी ईच्छुकांची वाढती संख्या लक्षात घेता याकरीता अर्ज सादर करण्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मुदतीत प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी पालिकेच्या संकेस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

वैद्यकिय क्षेत्रात काम करत असतांना सरकारी रूग्णालयातील अनुभवही महत्वाचा मानला जातो. याच कारणास्तव कंत्राटी भरती का असेना पण केवळ अनुभवाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खाजगी रूग्णालयातील उमेदवारही या पदासाठी अर्ज करत असतात. तर महापालीकेत कंत्राटी पध्दतीने नियुक्ती झाल्यास भविष्यात कायमस्वरूपी नियुक्तीसाठी प्रयत्न केले जाउ शकतात या अपेक्षेनेही अनेक युवक अर्ज करत असल्याचेही दिसून आले.

रिक्त पदे आणि संख्या

First Published on: August 28, 2019 11:58 PM
Exit mobile version