शिवसेना पदाधिकार्‍यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

शिवसेना पदाधिकार्‍यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक : काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमातीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदन जाधव बुधवारी (दि. ७) नाशिक दौर्‍यावर आले असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष संतोष नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली व नाशिक जिल्हाध्यक्ष शरद बोडके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्योग सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख महेश झुंजार आव्हाड, महाराष्ट्र चित्रपट निर्मिती महामंडळाचे प्रवक्ता दिनकर पांडे व नेहरू युवा केंद्र पुरस्कारप्राप्त संतोष साळवे आदी मान्यवरांनी आपल्या सहकार्‍यांसह काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमातीत प्रवेश केला.

जाधव यांनी मान्यवरांचे पक्षात स्वागत करताना पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगत इतर पक्ष, संघटनांमधून ज्या पदाधिकार्‍यांना पक्षात यायचे असेल त्यांचे पक्षात स्वागत केले जाईल अशी ग्वाही दिली. नाथ यांनी बोडके यांच्या कार्याचे कौतुक केले व महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्हाचा व्हिजेएनटी विभागाच्या कार्याचे कौतुक केले. बोडके यांनी याप्रसंगी प्रदेश पदाधिकार्‍यांना येणार्‍या काळात महिला व युवक मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. नाशिक शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी लवकरच करणार असून त्यात विमुक्त जाती व भटक्या जमातीतील सर्व जाती धर्मातील मान्यवरांना पद देऊन त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार असल्याचेही बोडके यांनी सांगितले.

जिल्ह्यात कुठेही कुणावरही अन्याय अत्याचार होत असेल तर नाशिक जिल्हाचा व्हिजेएनटी विभाग हा त्यांच्या पाठिशी असेल याची ग्वाही दिली. शिवसेना उद्योग सहकारसेनेचे जिल्हाप्रमुख महेश झुंजार आव्हाड यांनी बोडके यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करतांना अनेकांचे प्रश्न कसे सुटतील यावर लक्ष देणार असल्याचे सांगितले. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव, प्रदेश पदाधिकारी राहुल दिवे, माजी नगरसेविका हेमलता पाटील, कल्पना पांडे, राजेंद्र बागुल, गौरव सोनार आदी मान्यवरांनी प्रवेश केलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.

First Published on: December 9, 2022 12:57 PM
Exit mobile version