शिंदेच्या बंडाळीनंतरही ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुच, नाशिकच्या शंभर तरुण नेत्यांचा प्रवेश

शिंदेच्या बंडाळीनंतरही ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुच, नाशिकच्या शंभर तरुण नेत्यांचा प्रवेश

नाशिक : महेंद्र आव्हाड (Mahendra Awad) यांच्या नेतृत्वाखाली नाशिक (Nashik) पूर्व मतदार संघातील शेकडो तरुणांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. यावेळी उपनेते सुनील बागूल यांनी वक्तव्य केले की, हा शुभ संकेत म्हणावा लागेल. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे लोकांना आता पटू लागले आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात कार्यकर्ते पुन्हा या पक्षात प्रवेश करत आहेत. पक्षाच्या शालिमार कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी उपस्थित सुनील बागुल तसेच जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जिल्हा उपप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, माजी नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी, गोकूळ पिगंळे, प्रेमलता जुन्नरे, मंदा दातीर, स्वाती पाटील आदींच्या हस्ते शिवबंधन बांधून शेकडो तरुणांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष विजय करंजकर म्हणाले की, पक्षात आलेल्या सर्वांचा सन्मान बाळगला जाईल, तर सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड म्हणाले की, गद्दार आज कितीही उड्या मारत असले तरी त्यांची खरी स्थिती काय आहे ते त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे आता पर्यायच उरलेला नाही.

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीत गद्दार चांगलेच तोंडावर आपटणार आहेत. लोक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूनेच मोठया प्रमाणात मते देतील. त्यावेळी असली कोण आणि नकली कोण याचा निर्णय होईल.

पंचवटी परिसरातील शिवसेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अजय गोसावी, उज्वल मोरे, आकाश महामाने, प्रविण निकम, यश गोसावी, आयुष भोई, प्रशांत निकम, ओंकार सूर्यवंशी, हितेश मराठे, दर्शन जाधव, संदीप वाघ, शुभम तांबे, किरण मोगल, मधुकर आव्हाड यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.

First Published on: April 12, 2023 10:42 AM
Exit mobile version