…आणि हे आहे ‘भवन महानगरपालिका नाशिक’

…आणि हे आहे ‘भवन महानगरपालिका नाशिक’

महापालिका प्रशासनाने झाकलेला नामफलक.

लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सर्वत्र लागू असली तरीही तिचा बाऊ मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये केला जात आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या उद्देशालाच छेद दिला जात आहे. महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनाच्या फलकावरील ‘राजीव गांधी’ या नावावर प्रशासनाने चक्क कागद चिटकवला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे बौद्धिक धिंडवडे उडाले आहे.

वास्तविक, महापालिकेच्या मुख्यालयाला राजीव गांधी यांचे नाव यापूर्वीच दिलेले असल्याने या नावातून मतदारांना काय प्रलोभन मिळणार? शिवाय एकीकडे नाव झाकण्याचे ‘कष्ट’ उपसले जात असताना भवनात असलेला राजीव गांधींचा पुतळा मात्र, खुला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या लेखी आचारसंहिता म्हणजे नक्की काय याचाच उलगडा झालेला दिसत नाही. मुळात आचारसंहितेच्या मार्गदर्शिकेत महापुरुष तसेच दिवंगतांचे पुतळे झाकण्याबाबत कोणतेही निर्देश नसताना महापालिका प्रशासनाकडून याचा उगाचच बाऊ केला जात असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अप्पर जिल्हाधिकारी पदावर यापूर्वी सेवा बजवलेली असतानाही त्यांच्या महापालिकेतील कार्यकाळात आचारसंहितेचा बाऊ होत आहे.

First Published on: March 29, 2019 2:22 PM
Exit mobile version