‘एक्साईज विभागा’चा सुरगाणा, पंचवटीत छापा

‘एक्साईज विभागा’चा सुरगाणा, पंचवटीत छापा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा मद्यविक्री व वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) छापासत्र सुरु केले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी शनिवारी (ता.२४) सुरगाणा व पंचवटी परिसरा छापे टाकत दोनजणांना अटक केली. या दोन्ही कारवाईत एकूण १ लाख ७० हजार ४६० किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.

राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने सुरगाणा व पंचवटी परिसरात बेकायदा मद्यविक्रीच्या ठिकाणी छापा टाकला. चिंचपाडा, सुरगाणा येथील छाप्यात दमण निर्मित जॉन मार्टिन व्हिस्किच्या ६७२ सीलबंद बाटल्यांचे १४ बॉक्स, इंपेरिअर ब्ल्यू व्हिस्किच्या १४४ सीलबंद बाटल्यांचे ३ बॉक्स, हायवर्डस बिअरचे १२० टिनचे ५ बॉक्स, बनावट देशी दारु टँगो पंचच्या ४८० बाटल्यांचे १० बॉक्स असा एकूण १ लाख ३२ हजार ७२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत त्रिकमरम मियाजलाराम रेबारी याला अटक केली.

दुसर्‍या कारवाईत, वाल्मिकनगर, पंचवटी येथे हरयाणानिर्मित इंम्पॅक्ट ग्रेन व्हिस्किच्या ७२ बाटल्या असे एकूण ३७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाने सुरेशकुमार धरमवीर सिंग याला अटक केली.

First Published on: August 25, 2019 8:27 PM
Exit mobile version