बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,एका महिला डॉक्टरांसह पाच जणांना अटक

बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,एका महिला डॉक्टरांसह पाच जणांना अटक

Exposure of counterfeit notes,Five people, including a female doctor, were arrested

लासलगाव – पाचशे रूपयांच्या २९१  बनावट चलनी नोटा व्यवहारात आणऱ्या टोळीचा  फर्दाफाश  लासलगाव पोलीसांनी  केला असुन एका महिला डाॅक्टरसह पाच जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,लासलगाव व परिसरात बनावट चलन व्यवहारात आणणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. लासलगाव येथील राहणारे  मोहन बाबुराव पाटील व डाॅ.  प्रतिभा बाबुराव घायाळ दोन्ही रा लासलगाव,  विठ्ठल चंपालाल नाबरीयारा कृषीनगर लासलगाव बनावट नोटा चलनात आणत असल्याची खात्रीलायक माहिती होती यांचेकडे सखोल चौकशी केली असता रविंद्र हिरामण राऊत रा पेठ व विनोद मोहनभाई पटेल रा पंचवटी नाशिक हे बनावट ५०० रुपयांच्या चलनी नोटा देणार असल्याची माहिती मिळाली.

याबाबत पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माथुरी कांगणे , पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लासलगावचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सपोउनि राजेंद्र अहिरे, पोलीस हवालदार बाळु सांगळे,पोलीस नाईक कैलास महाजन, योगेश शिंदे, संदिप शिंदे , पोका प्रदिप आजगे , गणेश बागुल , कैलास मानकर , सागर आरोटे, देविदास पानसरे, महिला पोलिस शिपाई मनीषा शिंदे यांचे पथक तयार करून सदर पथकाने येवला रोड विंचुर येथे सापळा रचुन मोहन पाटील , डॉ.प्रतिभा घायाळ , विठठल नाबरीया यांना बनावट ५०० दराच्या २९१ नोटा देण्यासाठी आलेले रविंद्र हिरामण राऊत रा पेठ  व विनोद मोहनभाई पटेल रा पंचवटी – नाशिक यांना त्यांचेडील इटीऑस कार क्रमांक एमएच 03 सीएच 3762 हिचे मध्ये आले असता पंचासमक्ष छापा टाकुन मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

वरील इसमांनी भारतीय चलनातील ५०० दराच्या बनावट नोटा व्यवहारात आण्ण्यासाठी कब्जात बाळगल्या व प्रयत्न केला म्हणून पोकों प्रदिप आजगे यांचे फिर्यादीवरुन लासलगाव पोलीस स्टेशनला वरील इसमांविरुध्द भादवि कलम ४८९ क , ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोउनि रामकृष्ण सोनवणे हे करीत आहे.

First Published on: October 13, 2021 11:19 AM
Exit mobile version