बनावट स्वाक्षरी, ठरावाने बँक खात्यात बदल

बनावट स्वाक्षरी, ठरावाने बँक खात्यात बदल

Fraud Of 31 lakh pretendind dealership of Hindustan Unilever

बनावट स्वाक्षरीव्दारे केलेला ठराव बॅँकेला सादर करत कंपनीच्या बॅँक खात्याच्या अधिकारात बदल केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नवी मुंबई येथील सुहास निवृत्ती कारेकर यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सिडको येथील संशियत संतोष बाळकृष्ण बाभुळकरसह आयडीबीआय बँकेच्या अंबड शाखेचे व्यवस्थापक आणि आयसीआयसीआय बँकेच्या अंबड शाखेचे व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास कारेकर व संशयित संतोष बाभुळकर यांनी २०१६ मध्ये भागीदारीत टेक्निपोर्ट सिस्टम नावाची कंपनी सुरू केली. कंपनीचे व्यवहार करण्यासाठी पाथर्डी फाटा येथील आयडीबीआय बॅँकेच्या शाखेत दोघांचे सलग्न खाते उघडण्यात आले. त्यावेळी दोघांच्या स्वाक्षरीने किंवा एकाच्या स्वाक्षरीने कंपनीचा पैशांचा व्यवहार होणार असल्याचे ठरले होते. मात्र, संशयित संतोष बाभुळकर याने सुहास कारेकर यांची बनावट स्वाक्षरी करून नोव्हेबर २०१९ मध्ये बनावट ठराव बॅँकेस सादर केला. त्यातून बॅँक व्यवहाराच्या अधिकारात बदल करून घेतले. कारेकरांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर करत आहेत.

First Published on: March 7, 2021 10:16 PM
Exit mobile version