कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सटाणा, उमराणेत रास्तारोको

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सटाणा, उमराणेत रास्तारोको

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातल्याने मंगळवारी संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सटाणा, उमराणा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे कांद्याचे भाव  खाली आले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात कांदा चाळीत ठेवलेल्या कांदा ६० टक्के खराब झाल्याने पहिलेच कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. उर्वरित मालपासून शेतकऱ्यांना काही उत्पन्न होत असताना निर्यातबंदी घातल्याने कांद्याचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वीरगांव येथे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठावे या मागणीसाठी बागलान तहसील आवारातील पाण्याच्या टाक्यावर चढून प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार कपिल सोनवणे शोले स्टाईल आंदोलन करताना

रास्ता रोको आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून या निर्णयाचा निषेध केला. उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संतप्त शेतकऱ्यांची मनधरणी करून त्यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न केले.

 

 

बोलठाण येथेही रास्ता रोको

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे शेतकरी वर्गाकडून केंद्र शासनाने घातलेल्या निर्यात बंदी निर्णयामुळे कांदा भाव कमी होईल व शेतकरी वर्गाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी वर्गाने सकाळी ११ वाजता रास्ता रोको करून संतप्त भूमिका व्यक्त केल्या. साधारण अर्धा तास रस्ता रोखण्यात आल्याने दोन्ही बाजूने वाहनांची मोठी रांग दिसून आली. केंद्र सरकारने निर्यात बंदी वरील निर्णयावर विचार करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा व कांद्याचे बाजारभाव टिकून राहावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा या रास्ता रोकोतून दिसून आली.

First Published on: September 15, 2020 2:01 PM
Exit mobile version