उंटवाडीनजीक भिंत पडून मायलेक ठार

उंटवाडीनजीक भिंत पडून मायलेक ठार

भिंत कोसळल्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या मायलेकांचा

उंटवाडी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीलगत सोमवारी (दि. ७) सायंकाळी झालेल्या एका अपघातात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरासमोरील इमारतीच्या संरक्षक भिंतीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सरकटे कुटुंब राहत होते. सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टरद्वारे या ठिकाणी भर टाकली जात असताना, भिंत जागीच खडल्याने ती थेट पत्र्याच्या शेडवर कोसळली. त्याखाली दबून प्रकाश रमेश सरकटे (१८) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याची आई सत्यभामा रमेश सरकटे (४५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेत भिंतीसोबत ट्रॅक्टरमधील काही सामानही शेडवर पडले आणि ट्रॅक्टर उलटले. अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांना सावध होण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाची गाडीही लगेचच पोहोचली.

उंटवाडी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोरील संरक्षक भिंत कोसळली

त्यानंतर दोघा मायलेकांना सिव्हिल हॉस्पिटलात हलविण्यात आले. दरम्यान, नगरसेविका प्रियंका घाटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच, घटनेला जबाबदार व्यक्तींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
भर टाकण्याच्या कामामुळे दुर्घटना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या इमारतीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून भर टाकण्याचे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास भर टाकली जात असताना थेट भिंतच खचली. अचानक झालेल्या या घटनेमुळे खुद्द ट्रॅक्टरचालकादेखील सावरण्याची संधी मिळाली नाही. ज्या ठिकाणी भर टाकली जात होती, त्या भिंतीपलिकडचा भाग हा तुलनेने बराच सखल असल्याने, मातीचे वजन अधिक झाल्याने भिंत कोसळल्याचे सांगितले जाते आहे.

First Published on: January 7, 2019 9:51 PM
Exit mobile version