जन्मदात्या बापानेच केला सात वर्षे मुलीवर बलात्कार

जन्मदात्या बापानेच केला सात वर्षे मुलीवर बलात्कार

धक्कादायक! मुंबईत लिफ्टमॅनने 10 वर्षीय मुलीचा केला विनयभंग

नवीन नाशिक/इंदिरानगर : म्हसरूळच्या आधार आश्रमातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच अंबड पोलीस ठाणे हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. भाड्याच्या घरात रहात असणार्‍या जन्मदात्या बापानेच तब्बल सात वर्षे २२ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला. पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. याप्रकरणी नराधम पित्याविरुद्ध अंबड पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिची आई, वडील आणि लहान भाऊ समवेत राहते. बापाने मुलीवर २०१६ पासून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत वारंवार बलात्कार केला. बाहेर कुणालाही बलात्काराबाबत समजल्यास आपली बदनामी होईल, असे सांगून बापाने तिच्यामध्ये भीती निर्माण केली होती. त्यावेळी तिचे वय अवघे १५ होते. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने वारंवार अत्याचार केल्याने त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी नराधम पित्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दुयम पोलिस निरीक्षक निंबाळकर आणि उपनिरीक्षक सुनील बिडगर करीत आहेत.

मुलींवर होतोय घराबाहेर अन् घरातही अत्याचार

नाशिक शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घराबाहेर मुली असुरक्षित असल्याचे म्हटले जात असतानाच आता अंबडमधील बापाने मुलीवर तब्बल सात वर्षे अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घरातही मुली सुरक्षित आहेत का?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 

First Published on: December 9, 2022 12:13 PM
Exit mobile version