‘ओ शेठ’ गाण्याच्या वादावर अखेर पडदा !

‘ओ शेठ’ गाण्याच्या वादावर अखेर पडदा !

ओ शेठ’ हे गाणं गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. मात्र या गाण्याच्या मालकी हक्कावरून गीतकार, संगीतकार आणि गायक यांच्यात वाद सुरू होते. अखेर आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनं पुढाकार घेत यावादावर पडदा पाडलाय. या गाण्याचे गायक उमेश गवळी यानेच या गाण्याची चोरी केल्याचा आरोप गाण्याचे गीतकार – संगीतकार प्रनिकेत खुणे आणि संध्या केशे यांनी केला होता. त्यावरून गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले होते.

हे गाणं संध्या – प्रनिकेतचं असूनही त्यांच्या युट्यूब चॅनेलवर उमेश यांनी कॉपीराइटचा दावा केल्यानं आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याची तक्रार संध्या – प्रनिकेतनं केली होती. तर गायक उमेश गवळी यांनी या गाण्याचा कुणी एक व्यक्ती मालक नसून आम्ही तिघांनी मिळून गाण्याची निर्मिती केली असल्याचे सांगितले होते . मला या गाण्यासाठी कोणतेही मानधन मिळाले नसून, ऑडिओ त्यांच्या युट्यूब चॅनेलवर आणि व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करायचे ठरले होते. मग आता यावरून वाद का? असे अनेक आरोप करण्यात आले. मात्र अखेर या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या नाशिक शहराध्यक्ष अक्षय खांडरे यांनी पुढाकार घेत मध्यस्थी करून हा वाद मिटवलायं.

First Published on: September 27, 2021 6:52 PM
Exit mobile version