नाशकात मास्क न वापरणाऱ्या 353 जणांवर गुन्हे दाखल

नाशकात मास्क न वापरणाऱ्या 353 जणांवर गुन्हे दाखल

महाराष्ट्र पोलीस

कोरोनाने नाशिक जिल्ह्यात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीत अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. तरीही, काहीजण मास्क न वापरता घराबाहेर पडत आहेत. अशा 353 जणांवर पोलिसांनी 35 दिवसांत गुन्हे दाखल केले आहेत.

नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरीच थांबावे, घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक कामानिमित्त घराबाहेर जाताना नागरिकांनी मास्क किंवा रुमालाचा वापर करून शारीरिक अंतर ठेवावे, प्रशासकीय आदेशाचे पालन करावे, असे पोलीस वारंवार आवाहन करत आहेत. तरीही, काहीजण विनाकारण रस्त्यावर येत भटकंती करत आहेत. अनेकजण सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतर ठेवता आणि मास्क व रूमालाचा वापर न करता गर्दी करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 22 मार्च ते 25 एप्रिल या कालावधीत पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 353 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच पोलिसांनी शनिवारी 53 जणांवर कारवाई केली आहे.

शनिवारी 144 जणांवर गुन्हे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 144 जणांवर शनिवारी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केेले आहेत. नागरिकांनी संचारबंदी आदेशाचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

 

First Published on: April 25, 2020 6:11 PM
Exit mobile version