कृषी अभ्यासक्रमाची पहिली यादी २८ जुलैला

कृषी अभ्यासक्रमाची पहिली यादी २८ जुलैला

प्रातिनिधीक फोटो

कृषी महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून, 28 जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, मत्स्यविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची जबाबदारी कृषी परिषदेकडे देण्यात आली आहे. त्यानुसार कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे व अर्ज सादर करण्यासाठी दि. १० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दि. १५ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. १६ ते २० जुलैदरम्यान ऑनलाईन हरकती घेतल्यानंतर दि. २६ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे ही प्रक्रिया राबण्यात येत आहे.
……

असे आहे वेळापत्रक

२९ जून ते १० जुलै : ऑनलाइन अर्ज करणे

१५ जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादी

१६ ते २० जुलै : हरकती नोंदवणे

२६ जुलै : अंतिम गुणवत्ता यादी

२८ जुलै : पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी

३० जुलै ते २ ऑगस्ट : प्रवेश निश्चित करणे

३ ऑगस्ट : दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा

६ ऑगस्ट : दुसर्‍या फेरीची निवड यादी

७ ते ९ ऑगस्ट : प्रवेश निश्चित करणे

First Published on: July 1, 2019 6:33 PM
Exit mobile version