दत्तक नाशकात विश्वातील पहिला ‘मेट्रो निओ’ प्रकल्प

दत्तक नाशकात विश्वातील पहिला ‘मेट्रो निओ’ प्रकल्प

सार्वजनिक वाहतुकीला बळकटी देण्यासाठी मेट्रोच्या धर्तीवर नाशिकमध्ये ‘मेट्रो निओ’चा महत्वकांक्षी प्रकल्प महामेट्रोने हाती घेतला आहे. जगात अशा प्रकारे प्रथमच टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी गंगापूर ते नाशिकरोड आणि गंगापूर ते सीबीएसमार्गे मुंबईनाका, असे दोन मार्ग विकसित केले जाणार आहेत. अर्थात हे मार्ग जमिनीवरचे नसून हवेतील (पूलस्वरुपात) असतील. महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी ६० टक्के कर्ज घ्यावे लागणार असले तरीही ते देण्यासाठी जर्मन सरकारने सकारात्मकता दर्शवल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकची लोकसंख्या २० लाखांपर्यंत गेली असून शहराला सक्षम अशा सार्वजनिक परिवहन व्यवस्थेची गरज आहे. मेट्रो प्रकल्प राबवायचा झाल्यास त्यासाठी प्रती किलोमीटर २५० ते ४०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. शिवाय तिकीटांच्या दरामुळे प्रवासीही मेट्रोपासून दूर राहतात. मेट्रोचे बांधकाम आर्थिकदृष्ठ्या व्यवहार्य नसल्याने शासनाने महामेट्रोच्या माध्यमातून ‘निओ मेट्रो’चा प्रकल्प नाशिकमध्ये साकारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने नाशिक शहराकरता एक प्रभावी, स्वस्त, आणि पर्यावरणपूरक अशी परिवहन प्रणाली देण्याचा निश्चय केला आहे. जानेवारी २०१९ मध्ये ही जबाबदारी महामेट्रोस सोपवण्यात आली आहे. महामेट्रोने या संदर्भात शक्याशक्यतेचा अभ्यास करून आपला अहवाल सिडको, नाशिक महापालिका, राज्य शासन आदींना सादर केला आणि संबंधितांशी सल्लामसलत करून याबाबतचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. हा अहवाल जुलै राज्य शासनाकडे मंजुरीकरीता सादर करण्यात येईल. हा संपूर्ण प्रकल्प सुमारे १८०० कोटींचा असून त्यातील ६० टक्के निधी हा कर्जाच्या माध्यमातून उभा राहील. ४० टक्के निधी केंद्र आणि राज्य सरकार देईल. नागपूरला मेट्रोच्या सादरीकरणावेळी नाशिकच्या मेट्रो निओचे सादरीकरण जर्मन सरकारचे परराष्ट्र मंत्री लिंडेनर यांच्यासमोर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना हा प्रकल्प इतका पसंतीस उतरला की त्यांनी तातडीने आर्थिक सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी स्पष्ट केले.

मेट्रोच्या किमतीच्या तुलनेत मेट्रो निओची किंमत सुमारे ६० कोटी रुपये प्रति किलोमीटर असेल. बैठकीस महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, विरोधीपक्षनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते जगदीश पाटील, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आदी उपस्थित होते. यावेळी ब्रिजेश दीक्षित यांच्यासह नाशिक मेट्रो प्रकल्पाचे कार्यकारी संचालक एन. के. सिन्हा, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) डॉ. हेमंत सोनावणे आणि राईट्सचे अधिकारी यांनी नाशिक मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गाची पाहणी केली.

‘ मेट्रो-निओ’चे ठळक वैशिष्ठये –

एकूण ३२ किलोमीटरचे मार्ग-

या दोन मार्गावर बॅटरीवरील फिडर बस सेवा

First Published on: July 22, 2019 8:58 PM
Exit mobile version