नाशिकची विमानसेवा विस्कळीत

नाशिकची विमानसेवा विस्कळीत

प्रातिनिधीक फोटो

एअर अलायन्सच्या तांत्रिक कारणास्तव आत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडले. नाशिकच्या सवेवरही त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे नाशिकहून हैदराबाद आणि अहमदाबादसाठी दिल्या जाणार्‍या विमानसेवेवरही त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे नियोजीत वेळेपेक्षा तीन तास उशिराने ही उडडाणे झाली.

ओझर विमानतळ येथून एअर अलायन्समार्फत हैदराबाद, अहमदाबादसाठी सेवा दिली जाते. नियोजीत वेळेनुसार हैदराबादहून नाशिकला १२ वाजून २० मिनीटांनी विमानाचे लॅण्डिंग होते तर १२ वाजून ५० मिनिटांनी टेक ऑफ होते. मात्र आता सुमारे तीन तास उशिराने म्हणजे ३ वाजून ३० मिनीटांनी लॅण्डिंग झाले तर ४ वाजता हैदाराबादकडे टेकऑफ झाले. अहमदाबादसाठी नियोजीत वेळेनुसार सकाळी ८ वाजून ३० मिनीटांनी लॅण्डिंग होते. तर ९ वाजून ३० मिनीटांनी टेक ऑफ होते. मात्र अहदाबादसाठीही विमानसेवेला तीन तास उशिर झाल्याने दुपारी १२ वाजता लॅण्डिंग झाले तर १२ वाजून ३० मिनीटांनी टेक ऑफ झाले. याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तांत्रिक कारणास्तव आज विमानसेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या विलंबामुळे ओझर विमानतळावर अनेक प्रवासी विमानाच्या प्रतिक्षेत खोळंबले होते. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय झाली. एअर अलायन्सप्रमाणेच आज एअर इंडीयाचीही देशभरातील विमानसेवा विस्कळीत झाली होती.एअर इंडीयाचे सीता सर्व्हर बंद पडल्याने ही सेवा विस्कळीत झाल्याचा खुलासा कंपनीने केला आहे. एअर अलायन्स ही एअर इंडीयाचीच उपकंपनी असून या सर्व्हर बंदचा परिणाम एअर अलायन्सवरही झाला असावा अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

First Published on: April 28, 2019 7:17 AM
Exit mobile version