त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची भरदिवसा हत्या

त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची भरदिवसा हत्या

त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अहिल्यादेवी तलावानजीक आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास एका तरुणाने माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा ही घटना घडल्याने जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला.

धनंजय तुंगार यांना आज दुपारी ज्येष्ठ बंधू शेखर तुंगार यांच्या श्राद्ध विधी सुरु असताना कॉल आल्याने ते आहिल्यादेवी धरणाकडे गेले. त्या ठिकाणी संशयित गोणदके याने त्यांची चाकूने वार करत हत्या केली. ही बाब नागरिकांसह पोलिसांना समजताच सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे हत्येच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. धनंजय तुंगार यांचे वडील यादवराव तुंगार स्वातंत्र्यसैनिक होते.तुंगार कुटुंबात एकाच वर्षात वडील, ज्येष्ठ भाऊ आणि धनंजय तुंगार यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

First Published on: October 21, 2020 4:05 PM
Exit mobile version