माजी मंत्री पंकजा मुंडे २९ तारखेला नाशिक दौऱ्यावर

माजी मंत्री पंकजा मुंडे २९ तारखेला नाशिक दौऱ्यावर

नाशिक : भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या आता दिल्लीसह राज्याचा दौरा करणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान त्या नाशिक जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. भगवान गडावर शुक्रवारी (दि. १५) आयोजित दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील, महादेव जानकर यांसह समाजबांधव उपस्थित होते.

भाषणात मुंडे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकट काळात घराबाहेर पडणे अशक्य होते. त्यामुळे काही लोक आता आपण घरातच बसून असल्याचा आरोप करत आहेत. परंतु, सत्ता असो की नसो पंकजा मुंडे संपलेली नाही. यापुढे दिल्लीसह राज्यांचा दौरा करणार असल्याचे सांगत १७ ते २० ऑक्टोबरदरम्यान त्या दिल्लीत असतील. तसेच, २३ ते २५ तारखेदरम्यान त्या नवी मुंबई, पुणे येथील दौर्‍यावर आहेत. त्यानंतर २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तीन दिवस नाशिकमध्ये त्या काय चाचपणी करतात याविषयी कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्यात नाशिकसह निफाड, सिन्नर व येवला तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

First Published on: October 16, 2021 10:21 AM
Exit mobile version