आयआयटीच्या सर्व्हेक्षणात गड निखळण्याचा इशारा

आयआयटीच्या सर्व्हेक्षणात गड निखळण्याचा इशारा

आयआयटीच्या सर्व्हेक्षणात गड निखळण्याचा इशारा

सप्तश्रृंगी गडाची सद्यस्थिती काय आहे, याचे सर्वेक्षण शासनाने पवई येथील आयआयटी या उच्च तंत्रज्ञान संस्थेच्या तज्ज्ञांच्या मदतीने करून घेतलेले आहे. या संस्थेच्या सर्व्हेक्षण अहवाल गडाच्या दगडांमधील जोड निखळत असल्याचे नमूद केेलेले आहे. निखळणार्‍या दरडी जर कोसळल्या तर त्या सप्तश्रृंगी मंदिर परिसर, परशूरामबाला मंदिर प्रदक्षिणा मार्ग तसेच गडावरील गावठाणाला धोकादायक असल्याचे नमूद केलेले आहे.

संपूर्ण गडाचे सर्वेक्षण करून आयआयटीने गडाच्या दगडांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार त्याचे आठ प्रकारात वर्गीकरण करून अति धोका, कमी धोका तसच पावसाळ्यात या दरडी कोसळण्याचे प्रमाण कसे असेल, असे निष्कर्ष त्या अहवालात नमुद केलेले आहे. शासनाकडे हा अहवाल गेल्यानंतर सुमारे 80 हजार 715 चौरस मिटरचे काम करण्यासाठी गडावर पाच वर्षापूर्वी करण्यास सुरूवात केलेली होती. हे काम कोट्यवधी रूपये खर्च करून विदेशी तज्ज्ञांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आलेले होते. पण त्यापैकी फक्त 18 हजार 250 चौरस मीटरचे कामच करण्यात आलेले आहे. उर्वरित कामाला शासकीय विलंबाची किनार लाभली आहे.

गडावर जाळी बसविण्यापूर्वी त्याचा सर्वेक्षण खर्च सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टने 35 लाख 50 हजार रुपये केेलेला आहे. पण नंतर ट्रस्टकडून या कामाच्या पाठपुराव्यासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या संस्थेनेही भाविकांच्या सुरक्षेसाठी पाठपुरावा करावा, असे पीडब्लूडीचे म्हणणे आहे. पण पाठपुरावा करूनही गडाला जाळ्या बसविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागान केलेले नाही. त्यामुळे आमच्याकडे बोट दाखवून ही जबाबदारी पीडब्लूडी झटकत आहे. गडावर ट्रस्टच्या हद्दीत पहिली पायरी, देवीचे मंदिर, उतरण्याच्या पायर्‍या आणि भाविकांसाठी असलेले भक्तनिवासाच्या इमारती आहेत. गडावर थेट जाणार्‍या भाविकांना थेट गाभार्‍यात सुरक्षितता सध्या लाभत आहे. कारण डे्रन मेस आणि रॉक फॉल बेरीअरचे काम थेट मंदिराच्या परिघात 18 हजार चौरस मिटरमध्ये झालेले आहे. भाविकांच्या हितासाठी ट्रस्टने पाठपुरावा करावाच, अशी भाविकांचीही इच्छा आहे. देवीच्या दर्शनाला येणारे भाविक हे गडावरील ग्रामस्था अगोदर महत्वाचा घटक आहे. त्यांचा वावर हा देवीमंदिर, शिवालय तलाव, शितकडा, विविध कुंड आणि नवसपुर्तीसाठी विविध जागेवर थांबणार्‍या जागांवर असतो. उंचावरून जर दरड कोसळीच तर या परिघ गाठण्यास तिला किती वेळ लागेल, याची चिंता कोणलाही सध्या नाही.

ट्रस्टकडून कागदोपत्री पाठपुरावा

गडावर संरक्षक जाळ्या बसविण्याच्या निधीसाठी पत्रव्यवहार हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार केला गेला आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही, आणि वरून हाच विभाग म्हणतोय की, ट्रस्टकडून पाठपुरावा करणे गरजेचे होते. हे म्हणणे म्हणजे पीडब्लूडीच्या उलट्या बोंबा आहेत. भाविकांच्या संरक्षणाची जबाबदारी आणि चिंता जेवढी ट्रस्टला आहे. तेवढी शासकीय यंत्रणेला नाही, असे म्हणणे सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टने व्यक्त केलेले आहे.

First Published on: July 29, 2019 11:45 PM
Exit mobile version