कोरोनाबाधितांना दिलासा; ४ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध

कोरोनाबाधितांना दिलासा; ४ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध

केंद्र सरकराने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कच्च्या मालावरील कस्टम ड्यूटी हटवली

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि रूग्णांची पायपीट, तसंच त्याच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता यावी, यासाठी जिल्हा प्रशासनानं भरारी पथकांची नेमणूक केल्यानंतर आता प्रत्येक मेडिकलवर रेमेडेसिवीरचा उपलब्ध साठा आणि त्याच्या किंमतीची माहिती उपलब्ध होत असल्यानं रुग्णांची गैरसोय दूर झाल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं.

जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरचा तुटवडा व काळाबाजार होत असल्याची माहिती प्रसार माध्यमातून पुढे येत होती. त्या पार्श्वभुमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करून त्यांना भरारी पथकासाठी मनुष्यबळ व वाहनही अधिग्रहित करून देण्यात आले होते. त्यानंतर ज्या औषधालयांमध्ये ही इंजेक्शन्स उपलब्ध आहेत त्यांचीही यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सध्या भरारी पथक प्रत्येक औषधालय, हॉस्पिटल्सला भेट देत असून तेथे उपलब्ध साठ्याची माहिती, त्याप्रमाणे साठा, झालेली विक्री यांची शहानिशा करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात रेमडेसिविरचा पुरेसा साठा रूग्णांना वेळेवर उपलब्ध होत असून, तक्रारींचे प्रमाणही कमी झालेले आहे, असेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

First Published on: September 30, 2020 6:45 PM
Exit mobile version