पोलीस ठाण्याच्या आवारात ‘फ्री स्टाइल’; महिलांना जातीवाचक शिवीगाळ

पोलीस ठाण्याच्या आवारात ‘फ्री स्टाइल’; महिलांना जातीवाचक शिवीगाळ

पोलिसांच्या माहितीनुसार, छाया नाडे यांची बहीण माया खडसे यांच्यासोबत पुजा धुमाळ यांचे भांडण झाले होते. याप्रकरणी माया खडसे व छाया नाडे मंगळवारी (दि.२८) रात्री १०.३० वाजता आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्या दोघी पोलीस ठाण्याच्या गेटबाहेर येताच पाचजणांनी त्यांना पकडले. या ठिकाणी दोघींना पाचजणांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव करत आहेत.

First Published on: January 31, 2020 3:58 PM
Exit mobile version