ऑनलाईन बुक करा बाप्पांची मूर्ती

ऑनलाईन बुक करा बाप्पांची मूर्ती

सध्या डिजिटल इंडियासाठी देशभरात कॅशलेस व्यवहार होत असताना आता लाडक्या बाप्पांची मूर्तीदेखील कॅशलेस घेता येणार असल्याने आधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. पेटीएम, गुगल पे, भीम आदी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे गणेशभक्तांकडून मूर्ती घेतल्या जात असल्याचे दिसून आले आहे.

तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची शहरभर लगबग सुरू असतानाच बाप्पांची मूर्ती विकत घेण्यासाठीही विविध स्टॉल्सवर भक्तांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यातच आता ऑनलाईन खरेदीची सुविधा उपलब्ध झाल्याने अनेकांनी त्यास प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. ईदगाह मैदान, डोंगरे वसतिगृह, ठक्कर डोमसह शहरातील अन्य ठिकाणच्या गणेश मूर्ती स्टॉल्सवर विक्रेत्यांनी बारकोड स्कॅनिंगचे ऑप्शन देत कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे क्षणार्धात पैसे देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. खिशात पुरेसे पैसे नसतानाही ऑनलाईन पेमेंटमुळे गणेशभक्तांना विक्रेत्यांना पैसे ट्रान्सफर करता येत असल्याने त्यांनीही या सुविधेचे स्वागत केले आहे.

ऑनलाईन सुविधेमुळे पैसे देणे सोपे

गणेशमूर्ती ऑनलाईन विक्रीमुळे वेळ वाचत आहे. विक्रेत्यांनी दिलेल्या या सुविधेमुळे घरबसल्यादेखील श्रींची मूर्ती निवड करून लगेच बूक करता आली. ऑनलाईन सुविधेमुळे पैसे देणेही सोपे झाले. – दीपक शिरसाठ

First Published on: August 27, 2019 11:58 PM
Exit mobile version