आले खरेदीतून कर्नाटकच्या एकास साडेतीन लाखांना गंडा

आले खरेदीतून कर्नाटकच्या एकास साडेतीन लाखांना गंडा

इंडिया मार्ट अ‍ॅपद्वारे संपर्क करून १२ टन आले खरेदीची तयारी दाखवून नाशिक येथे आले ताब्यात घेऊन कर्नाटकच्या एकास संशयिताने ३ लाख ७० हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी तोफिक अन्सल फयाज अहमद (रा. दारू दमण स्ट्रीट, चिखमगंलूर, कर्नाटक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, इंडिया मार्ट अ‍ॅपद्वारे संशयिताने तोफिक यांच्याशी १ जून रोजी संपर्क साधला होता. त्यावेळी नाशिक येथे आले आद्रकचा चांगला भाव आहे. किलामागे १ रूपया कमिशन घेऊन तुम्हाला चांगले पैसे मिळवून देतो, असे सांगून संबंधित व्यक्तीने तोफिक अहमद यांना १२ टन आले आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तोफिक यांनी ४ लाख २० हजार रूपयांचा २०४ गोणे मिळून १२ टन आले घेऊन ते नाशिक आले होते. अंबड परिसरातील हॉटेल स्काँयलार्क येथे आयशर व पिकअपमधून आले लोड करून संशयित घेऊन गेले. त्यानंतर आल्याची परस्पर विक्री केली. तसेच जाताना तोफिक यांना १० हजार रूपये व ट्रकचे ४० हजाराचे भाडे देऊन उर्वरीत ३ लाख ७० हजार रूपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत.

First Published on: June 13, 2021 9:38 PM
Exit mobile version